Home remedies to remove wart

सुंदर दिसावं, छान रहावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यामुळे अनेक जण त्यांच्या सौंदर्याची खास काळजी घेत असतात. महागडे सौंदर्यप्रसाधने, वेगवेगळ्या ट्रिटमेंट घेऊन लोक आपल्या त्वचेची काळजी घेत असतात. मात्र, अनेकदा चेहऱ्यावर किंवा शरीराच्या अन्य दर्शनी भागावर चामखीळ नावाचा प्रकार पाहायला मिळतो. त्यामुळे अनेकदा ही चामखीळ सौंदर्यात बाधा येत असल्याचं म्हणत लोक तिच्यापासून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु, अनेक उपचार आणि महागड्या ट्रिटमेंट घेतल्यानंतरही या समस्येचं निराकरण होत नाही. म्हणूनच, घरच्या घरी चामखीळची समस्या कशी दूर करायची ते कॉस्मेटिक डमॉटोलॉजिट आणि डर्मेटो-सर्जन डॉ. रिंकी कपूर यांनी सांगितलं आहे.

 केळीचं साल - केळीच्या सालात मोठ्या प्रमाणावर अँटी-ऑक्सिडंट असतात. त्यामुळे चामखीळ काढण्यास ते उपयुक्त ठरतात. यासाठी निदान महिनाभर तरी केळीचं साल दररोज चामखीळ असलेल्या ठिकाणी चोळावं.

केळीचं साल – केळीच्या सालात मोठ्या प्रमाणावर अँटी-ऑक्सिडंट असतात. त्यामुळे चामखीळ काढण्यास ते उपयुक्त ठरतात. यासाठी निदान महिनाभर तरी केळीचं साल दररोज चामखीळ असलेल्या ठिकाणी चोळावं.

बेकिंग सोडा - बेकिंग सोडा व एरंड तेल यांची पेस्ट तयार करुन घ्या. त्यानंतर ही तयार पेस्ट चामखीळ असलेल्या ठिकाणी लावून रात्रभर तशीच ठेवा. दुसऱ्या दिवशी हा लेप धुवून टाका. जवळपास ४-५ दिवस हा प्रयोग केल्यास चामखीळपासून सुटका करता येईल.

बेकिंग सोडा – बेकिंग सोडा व एरंड तेल यांची पेस्ट तयार करुन घ्या. त्यानंतर ही तयार पेस्ट चामखीळ असलेल्या ठिकाणी लावून रात्रभर तशीच ठेवा. दुसऱ्या दिवशी हा लेप धुवून टाका. जवळपास ४-५ दिवस हा प्रयोग केल्यास चामखीळपासून सुटका करता येईल.

 टी ट्री ऑईल- टी ट्री ऑईलचे 3 थेंब एरंडेल तेलासह एकत्र करू शकता आणि कापसाच्या सहाय्याने चामखीळीवर लावू शकता. दिवसातून दोन ते तीन वेळा असे केल्यास नक्कीच फायदा होईल.

टी ट्री ऑईल- टी ट्री ऑईलचे 3 थेंब एरंडेल तेलासह एकत्र करू शकता आणि कापसाच्या सहाय्याने चामखीळीवर लावू शकता. दिवसातून दोन ते तीन वेळा असे केल्यास नक्कीच फायदा होईल.

 एरंडेल तेल- सुमारे तीन आठवड्यांसाठी किंवा चामखीळ गळून पडेपर्यंत दररोज एरंडेल तेल लावा.

एरंडेल तेल- सुमारे तीन आठवड्यांसाठी किंवा चामखीळ गळून पडेपर्यंत दररोज एरंडेल तेल लावा.

 व्हिटॅमिन ई गोळ्या - व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे तेल चामखीळीवर लावा. पट्टीने झाकून ठेवा आणि रात्रभर तसेच सोडून द्या. आपल्याला असे दोन आठवड्यांसाठी करावे लागेल.

व्हिटॅमिन ई गोळ्या – व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे तेल चामखीळीवर लावा. पट्टीने झाकून ठेवा आणि रात्रभर तसेच सोडून द्या. आपल्याला असे दोन आठवड्यांसाठी करावे लागेल.

व्हिटॅमिन सी - एस्पिरीनप्रमाणेच त्वचेवर व्हिटॅमिन सीची गोळी बारीक करून घ्या आणि रात्रभर लावून ठेवा.

व्हिटॅमिन सी – एस्पिरीनप्रमाणेच त्वचेवर व्हिटॅमिन सीची गोळी बारीक करून घ्या आणि रात्रभर लावून ठेवा.

क्लिअर नेल पॉलिश -चामखीळीवर दोन ते तीन कोटींग क्लिअर नेल पॉलिश लावा. दिवसातून दोन ते तीन वेळा असे केल्याने चामखीळीचा ऑक्सिजन पुरवठा कमी करण्यात मदत करते आणि ते खाली पडते.

क्लिअर नेल पॉलिश -चामखीळीवर दोन ते तीन कोटींग क्लिअर नेल पॉलिश लावा. दिवसातून दोन ते तीन वेळा असे केल्याने चामखीळीचा ऑक्सिजन पुरवठा कमी करण्यात मदत करते आणि ते खाली पडते.

 एस्पिरीन- एस्पिरीनमध्ये सॅलिसिलिक अॅसिड असते. एस्पिरिनची टॅब्लेट क्रश करा आणि पाण्यात मिसळा, ती पेस्ट चामखीळ असलेल्या भागावर लावा आणि रात्रभर तशीच राहू द्या.

एस्पिरीन- एस्पिरीनमध्ये सॅलिसिलिक अॅसिड असते. एस्पिरिनची टॅब्लेट क्रश करा आणि पाण्यात मिसळा, ती पेस्ट चामखीळ असलेल्या भागावर लावा आणि रात्रभर तशीच राहू द्या.

कोरफड - कोरफडीचा ताजा रस चामखीळ असलेल्या भागावर लावा.

कोरफड – कोरफडीचा ताजा रस चामखीळ असलेल्या भागावर लावा.

बटाटा- बटाट्याचा तुकडा अथवा त्याची पेस्ट चामखीळीच्या भागावर लावा. दिवसातून दोन वेळा हा प्रयोग करा.

बटाटा- बटाट्याचा तुकडा अथवा त्याची पेस्ट चामखीळीच्या भागावर लावा. दिवसातून दोन वेळा हा प्रयोग करा.

अननस - रोज ताज्या अननसाचा रस लावा.

अननस – रोज ताज्या अननसाचा रस लावा.

संत्र्याची साल : दिवसातून एकदा संत्र्याच्या सालीने चामखीळीची जागा घासून घ्या. त्यानंतर हळूहळू चामखीळ आपला रंग बदलून, गडद होईल आणि सुमारे तीन आठवड्यांत आपोआप पडून जाईल.

संत्र्याची साल : दिवसातून एकदा संत्र्याच्या सालीने चामखीळीची जागा घासून घ्या. त्यानंतर हळूहळू चामखीळ आपला रंग बदलून, गडद होईल आणि सुमारे तीन आठवड्यांत आपोआप पडून जाईल.

लसूण आणि लवंग - त्वचेच्या विविध समस्यांवर उपचार करण्यासाठी साधे पण अत्यंत प्रभावी घटक आहेत. लसणाची एक पाकळी व एक लवंग क्रश करून घ्या आणि पाण्यात मिसळा, लावा आ पेस्ट चामखीळ असलेल्या भागात लावून तो भाग झाकून ठेवा. सुमारे चार आठवड्यांसाठी दररोज हे प्रयोग करून पहा आणि चामखीळीची समस्या दूर करा.

लसूण आणि लवंग – त्वचेच्या विविध समस्यांवर उपचार करण्यासाठी साधे पण अत्यंत प्रभावी घटक आहेत. लसणाची एक पाकळी व एक लवंग क्रश करून घ्या आणि पाण्यात मिसळा, लावा आ पेस्ट चामखीळ असलेल्या भागात लावून तो भाग झाकून ठेवा. सुमारे चार आठवड्यांसाठी दररोज हे प्रयोग करून पहा आणि चामखीळीची समस्या दूर करा.

Article Source – https://www.esakal.com/image-story/home-remedies-to-remove-wart