Health news rosacea types Rythematotelangiectatic

 

त्वचाविकार : जाणून घ्या रोसासियाच्या चार प्रकारांविषयी

 या आजाराविषयी फार समज-गैरसमज आहेत.

त्वचाविकार : जाणून घ्या रोसासियाच्या चार प्रकारांविषयी

उन्हाळा सुरु झाला की अनेक आजार, विकार डोके वर काढू लागतात. यात बऱ्याचदा त्वचाविकाराच्या तक्रारी अधिक असतात. वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे त्वचेवर पुरळ येणे, सतत घाम येणे, तेलकट त्वचा यांसारख्या समस्या जाणवतात. त्यातच गेल्या काही काळापासून नागरिकांमध्ये रोसासिया हा त्वचेशीसंबंधित आजार दिसू लागला आहे.  या आजाराविषयी फार समज-गैरसमज आहेत. हा आजार कोणत्याही ठराविक कारणामुळे होत नाही. तसंच त्यावर कोणचे ठोस उपायदेखील नाहीत. मात्र, स्वत:ची नीट शारीरिक काळजी घेतली तर ही समस्या नक्कीच दूर होऊ शकते. रोसासियाचे काही प्रकार आहेत. हे प्रकार कोणते ते जाणून घेऊयात.

१. एरिथेटोमेटेलेंगिएक्टॅटिक  –
रोसासियाचा सर्वात सामान्य प्रकार म्हणून याकडे पाहिलं जातं. या प्रकारामध्ये फार काळ त्रास जाणवत नाही. परंतु, यात गाल, नाकावर लालसरपणा येणे, चेहऱ्यावरील रक्तवाहिन्यांना सूज येणे, त्वचेवर जळजळ होणं अशी काही लक्षणं दिसून येतात.

हेही वाचा : रोसासिया म्हणजे काय? जाणून घ्या या त्वचाविकाराविषयी

२. पॅपुलोपस्टुलर रोझासिया –
रोसासियाचा दुसरा सामान्य उपप्रकार म्हणजे पॅपुलोपस्टुलर रोझासिया आहे.  यात चेहऱ्याच्या मध्यभागी लालसरपणा दिसणे, फुफ्फुसांसारखे व्हाइटहेडसारखे दिसणारे अडथळे, मुरुम आणि गाठी तयार होणं, त्वचा लालसर पडणं आणि सूज येणं, हनुवटी, कपाळ, गाल आणि कानांवरील त्वचा सुजणे किंवा जाड होणे अशी लक्षणे दिसून येतात.

३. फिमाटस रोसासिया-
हा प्रकार खासकरुन पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. या प्रकाराला नासिकाग्रस्त म्हणूनही ओळखलं जाते. यात त्वचेला दाट जाडसरपणा येतो. हा अतियश दुर्मिळ प्रकार असून नाकातील त्वचा जाड होते. त्वचेवर सहज चट्टे येतात. हनुवटी, कपाळ, गाल, कान आणि पापण्यांवरची त्वचा देखील जाड होते. तसंच त्वचा तेलकट होते.

४. ओक्युलर रोसासिया-
ओक्युलर रोसासिया हा रोसासियाचा आणखी एक उपप्रकार  आहे. यामध्ये डोळ्याच्या आजुबाजूच्या भागावर परिणाम होतो. यात रक्त गोठणे आणि पाणचट डोळे, डोळ्यांमध्ये जळजण होणं आणि खाज सुटणं, डोळे कोरडे पडणे,डोळ्यावर पांढरा पडदा येणे अशा समस्या जाणवतात.

(लेखिका डॉ. रिंकी कपूर या मुंबईतील एस्थेटिक क्लिनिक अँड फोर्टिस हॉस्पिटलमध्ये कॉस्मेटिक डमॉटोलॉजिट आणि डर्मेटो-सर्जन आहेत.)

Article Source – https://www.esakal.com/health-fitness-wellness/health-news-rosacea-types-rythematotelangiectatic-rosacea-papulopustular