Easy and effective experts tips remove Holi colors

easy and effective expert tips to remove holi colours naturally

केमिकलयुक्त रंगांमुळे त्वचेच्या विविध समस्या उद्भवू शकतात

रंगांची उधळण करणारा सण म्हणजे होळी.  रंगपंचमीच्या दिवशी वापरण्यात येणाऱ्या रंगांमध्ये बरेचदा रासायनिक पदार्थांची भेसळ करण्यात आलेली असते. या रासायनिक घटकांमुळे त्याचे त्वचेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. हे परिणाम टाळण्यासाठी प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. केमिकलयुक्त रंगांमुळे त्वचेच्या विविध समस्या उद्भवू शकतात जसे की त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर डाग पडणे, लालसरपणा या त्वचेशीसंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रंगपंचमी खेळण्यापूर्वी आणि खेळल्यानंतर विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. होळीसाठी त्वचेची काळजी घेणे खरोखरच सोपे आहे. त्यामुळे हे उपाय कोणते ते पाहुयात.

होळी खेळण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी

१. केसांना चांगले तेल लावा. रंग खेळण्यापूर्वी नारळाच्या तेलाचे काही थेंब कोरफडीच्या गरामध्ये मिसळा हे मिश्रण केसांवर लावा.

२.  चांगल्या प्रतीचे मॉइश्चरायझर किंवा तेल वापरा. आपण आपल्या चेह-यासाठी नारळाचे तेल किंवा एरंडेल तेल देखील वापरू शकता.

३. जेल बेस सनस्क्रीन वापरा आणि बाहेर पडण्यापूर्वी 15 मिनिटे सनस्क्रीन लावा.

४. होळीचा रंग त्वचेच्या थेट संपर्कात येऊ नये यासाठी ओठांवर, नखांवर आणि डोळ्याभोवती व्हॅसलीन पेट्रोलियम जेलीचा एक थर लावा.

हेही वाचा : दिलासादायक! मुंबईतील लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ;  पालिकेने घेतला महत्त्वाचा निर्णय

५. डोळ्याचे रक्षण करण्यासाठी तसेच सूर्यप्रकाशापासून बचाव करणयासाठी चष्म्याचा वापर करा.

६.त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पित रहा.

७.  केस लांब असतील तर ते वर बांधा अथवा स्कार्फने झाकून ठेवा.

रंग खेळून आल्यानंतर घ्या ही काळजी 

१. त्वचेरील रंग काढण्यासाठी त्वचा घासू नका. तर सौम्य क्लिंझरने ती स्वच्छ करा.

२. शॅम्पू किंवा साबण वापरण्यापूर्वी टाळू आणि त्वचेवरील संपूर्ण रंग धुवून घ्या.

३. आंघोळ केल्यावर चेह-यावर मॉइश्चरायझर आणि केसांना सीरम लावा.

४. केस पूर्णतः कोरडे करा.

५. होळी उत्सवानंतर किमान आठवडाभर स्पा किंवा अन्य उपचार करणं टाळा.

( लेखिका डॉ. रिंकी कपूर या द एस्थेटिक क्लिनिकमध्ये त्वचाविकार तज्ज्ञ आहेत.)

Article Source – https://www.esakal.com/lifestyle/easy-and-effective-expert-tips-remove-holi-colours-naturally-423718